७ ते १५ मे पर्यंत दोडामार्गात अनेक निर्बंधांसह कडक लॉकडाऊन निश्चित..

७ ते १५ मे पर्यंत दोडामार्गात अनेक निर्बंधांसह कडक लॉकडाऊन निश्चित..

कुडाळ /-

कोरोनाने मांडलेला थैमान पाहता दोडामार्ग तालुक्यात अनेक कडक निर्बंधांसह लॉकडाऊन करण्याचा निर्णय दोडामार्ग प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी घेतला असून त्यात अनेक बंधनकारक निर्णय लादले आहेत,
पेट्रोल पंप, हॉस्पिटल, व मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहतील ,तसेच वृत्तपत्र विक्री व दूध विक्री सात ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत वाहने जप्त करण्यात येतील आणि कामानिमित्त गोव्यात जाणाऱ्या कामगार वर्गाला ये-जा करण्यास मनाई असून ये-जा केल्यास कामगार वर्गाने विलगीकरण कक्षात रहावे असे निर्बंध लागत दिनांक ७मे ते १५ मे पर्यंत दोडामार्ग तालुक्यात कडक लॉकडाऊन करण्यातचा निर्णय प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.

अभिप्राय द्या..