सावंतवाडी /-
गेल्यावर्षभरापासून कोरोना महामारीच्या काळात लोकांमध्ये जनजागृती व कोरोना संबधी अधिकृत आकडेवारी देण्यासाठी खेड्यापाड्यातून पत्रकार आपला जीव धोक्यात घालून अगदी तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. पत्रकारितेचे काम करत असताना अनेक पत्रकारांना कोरोना महामारीचा फटका बसला असून या महामारीत अनेक पत्रकारांचा मृत्यूही झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मदतीचा हातभार लावणे गरजेचे आहे. तसेच गेली अनेक वर्षे पत्रकारितेत काम करत असलेल्या पत्रकारांना पेन्शन लागू करावी व कोरोनाकाळात काम करत असलेल्या पत्रकारांना विमाकवच शासनाने द्यावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सावंतवाडी शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासाठी नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भाईप, उपध्यक्ष प्रसन्न गोंदावळे जिल्हा कार्यकरणी सदस्य मिलिंद धुरी जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद कांडरकर आदी उपस्थित होते.