कुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तत्व स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर प्रथम –

कुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तत्व स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर प्रथम –

वेंगुर्ला /-

कुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेत
डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला असुन या स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर व्दितीय क्रमांकाच्या विजेच्या नेमळे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आसिया सांगावकर तर तृतीय क्रमांक बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या दिव्यता मसुरकर आणि उत्तेजनार्थ न्यु इग्लिश स्कुलची मनाली पवार आणि विशेष प्रोत्साहनपर बक्षिस नील बांदेकर मुलाला देण्यात आले.
जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेला उंदड प्रतिसाद दिला होता.
या स्पर्धेचे परिक्षण सदानंद गुरुनाथ खानोलकर ,मुंबई यांनी केले असुन सर्व स्पर्धकाचे विशेष अभिनंदन करत विजेत्यांना शुभेच्छाही दिल्या.
कुलदेवता मित्र मंडळाच्या वतीने ही या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले असुन सर्व रक्कम स्वरुपातील बक्षिसे आणि ई प्रमाणपत्र लवकर विजेत्याना प्रदान करण्यात येईल,असे मंडळाच्या वतीने जाहिर करण्यात आले.

अभिप्राय द्या..