नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधीच्या आवाहनाला शहरवासीयांनी दिली साथ..

कुडाळ /-

कणकवली शहरात १ ते १० मे या कालावधीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन नगरपंचायत, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटना यांच्यातर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिक, व्यापारी तसेच विविध आस्थापनांनी आज कर्फ्युच्या पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद देत हा जनता कर्फ्यु १००% यशस्वी केला.गेल्या काही दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यात कणकवली कोरोना साठी हॉट स्पॉट बनला आहे . जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ कणकवली असल्याने संपूर्ण जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लोक बाजारहाट साठी येतात आणि त्यामुळे कोरोनाचा आलेख वाढता राहिला आहे . याला रोखण्यासाठी कणकवलीवासीयांनी दहा दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्धार केला.याला अनुसरून 1 मे ते 10 मे जनता कर्फ्यु पाळला जात आहे . केवळ दवाखाने आणि औषधे दुकान वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्या आली आहे . या जनता कर्फ्यु मुळे कणकवली मधील कोरोनाचा प्रादुर्भाव नक्की कमी होईल असा विश्वास कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page