कुडाळ /-
कडक लाॅगडाऊनच्या पार्श्वभुमीवर माणगात ११ नंतर सुरू असलेल्या दोन दुकानदारांवर धडक कारवाई केली आहे.कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री शंकर कोरे यांच्या पथकाने आज शनिवारी धडक देत कारवाई केली आहे.या माणगाव येथील दोन्ही दुकांनदारांना कुडाळ पोलिस ठाण्यात हजर करून पुढील कारवाई सुरू केली आहे.सोबत माणगाव पोलिस अंमलदार सुरेश धोत्रे, अजय फोंडेकर, सचिन सोन्सुरकर ,होमगार्ड पालव व आदेश हळदणकर उपस्थित होते.