वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी आलेल्या अहवालात एकूण ११ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.आज सकाळी रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये सागरतीर्थ ४,टेम्बवाडी १,आसोली १,आरवली बांधवाडी १,केरवाडा २,शिरोडा २ इत्यादी ठिकाणी ११ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.तसेच काल बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात १० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला असून यामध्ये उभादांडा वाघेश्वरवाडी १,उभादांडा वरचेमाड २,पेंडूर ३,परुळे आजारवाडी १,शेळपी १,मठ सिध्दार्थनगर १ व तुळस १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.
