मुलीच्या पहिल्या वाढदिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान…

मुलीच्या पहिल्या वाढदिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान…

मालवणातील पोलिस कर्मचारी व पत्रकार दाम्पत्याच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक…

मालवण /-
संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या विरोधात लढत आहे़. रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची हीच गरज ओळखून येथील महिला पोलिस कर्मचारी स्वाती आचरेकर व पत्रकार सिद्धेश आचरेकर यांनी आपली कन्या ज्ञानदा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ३० रक्तदात्यानी रक्तदान केले.
सामाजिक बांधिलकी जोपासत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीराचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
आचरेकर परिवार, जिल्हा रक्तपेढी, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान यांच्यावतीने आज येथील पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तपेढी विभाग सिंधुदुर्गचे डॉ. श्रीनिवास बेळणेकर, रक्तपेढी वैज्ञाानिक अधिकारी सुनिल बागवे, अधिपरिचारिका हेमांगी रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते किशोर नांदगावकर, नितीन गावकर, उल्हास राणे, नंदकुमार आडकर, नगसेवक यतीन खोत, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे सचिव किशोर नाचनोलकर, पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, सचिव कृष्णा ढोलम, बंटी केनवडेकर, उमेश मांजरेकर, प्रफुल्ल देसाई, अमित खोत, सौगंधराज बादेकर, महेश कदम, कुणाल मांजरेकर, मनोज चव्हाण, पी.के.चौकेकर ,संग्राम कासले, उमेश शिरोडकर, भूषण मेतर, आप्पा मालंडकर, प्रशांत हिंदळेकर, सिद्धेश आचेरकर, गणेश गावकर, अमित आचरेकर, अजित आचरेकर, संदेश आचरेकर, राजू आचरेकर, मयुरेश जाधव, केशव जाधव, स्वाती आचरेकर, स्नेहा गावकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..