MSEB ची रीडिंगची कामे स्थानिकांना मिळण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांची कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी

MSEB ची रीडिंगची कामे स्थानिकांना मिळण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांची कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी

कुडाळ /-

गेली विस वर्षे मिटर रीडिंगची कामे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणी करीत आहेत यापुढेही त्यांनाच कामे मिळाली पाहिजे अशी मागणी खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांच्याकडे केलेली असुन आज कार्यकारी अभियंता म्हणून आपणाकडे करीत आहोत अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी मराविमचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्या कडे केली_
खासदार विनायक राऊत पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या सह जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, शिवसेनेचे अतुल बंगे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज मिटर रीडिंग घेणारे स्थानिक कंत्राटदार यांनी आज गुरुवारी कार्यकारी अभियंता पाटील यांची भेट घेऊन मागणी केली.

आॅनलाईन टेंडर मुळे इथल्या स्थानिक लोकांच्या रोजी रोटीवर परीणाम होत असुन ही कामे स्थानिक लोक करीत आले आहेत त्यांनाच मिळाली पाहिजे तशा सुचना पालकमंत्री ना उदय सामंत खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी दीलेल्या आहेत त्यामुळे स्थानिक लोकांचा विचार व्हावा अशी मागणी पडते यांनी केली.

अभिप्राय द्या..