कुडाळ /-
कुडाळ येथील कुडाळेश्वर मंदिरात श्री रामनवमी उत्सव पारंपारिक पद्धतीने करण्यात आला. यावेळी कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, सरकारी मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.ईतर वेळी हा कुडाळेश्वर मंदिरातील उत्सव हा मोठया थाट-माटामद्धे साजरा केला जात होता.कोरोना संकट असल्याने हा उत्सव एकदम सध्या पद्धतीने साजरा झाला.लोकांनी ,भक्त भाविकांनी घरातच श्रीरामाचे ध्यान करावे, असे आवाहन गावातील कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.प्रतिवर्षी रामनवमी सह अन्य कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. मात्र यंदा केवळ मंदिरातील धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले आहेत.गेल्या वर्षीपासून संपूर्ण विश्वावर कोविडचे संकट आले आहे.कुडाळ तालुक्यातही गेल्या काही दिवसांन पासून कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले.यापार्श्वभूमीवर सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने या नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला.किर्तन, भजन,नाटक, महाप्रसाद आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.