जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी घेतला वेंगुर्ला तालुक्यातील कोरोना /वैद्यकीय यंत्रणेचा घेतला आढावा..

जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी घेतला वेंगुर्ला तालुक्यातील कोरोना /वैद्यकीय यंत्रणेचा घेतला आढावा..

वेंगुर्ला /-

कोरोना उपायोजना व वैद्यकीय यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत यांचा वेंगुर्ला तालुक्याचा वैद्यकीय यंत्रणेच्या उपस्थितीत आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथील कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याचे व डॉक्टर मुळे एम ओ यांची सदर ठिकाणी नियुक्ती आदेश होऊनही ते हजर होत नसल्याचे निदर्शनास आले यावेळी सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे मार्फत मुळे यांना तात्काळ वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच खानिकर्म मधून रुग्णवाहिका मंजूर असून त्यातील एक रुग्णवाहिका प्राप्त झाल्यावर ग्रामीण रुग्णालय साठी देण्याचे निश्चित करण्यात आले तोपर्यंत भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका घेण्याची कार्यवाही सुरू करणे बाबत सूचना केली. ग्रामीण रुग्णालय वेंगुरला येथे covaccine व covidshield या लसींचा तुटवडा असल्याचे लक्षात आल्याने जिल्हा परिषद स्तरावर उपलब्ध असलेल्या स्टॉक मधील 100 covaccine डोस चा पुरवठा ग्रामीण रुग्णालय करता तातडीने करण्यात आला.तदनंतर अध्यक्ष यांनी वेंगुर्ला कॅम्प परिसरातील swab center व कोविंड रुग्ण काळजी केंद्रास भेट दिली. तेथे रुग्णांशी चर्चा करून सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.
पुढे उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे भेट देऊन त्या ठिकाणचा आढावा घेतला सदर ठिकाणी रुग्णालयास सर्जन ची आवश्यकता असल्याने व सद्यस्थितीत कंट्रोल पद्धतीवर गायनॅक असल्याने कायम तत्वावर नेमणूक होणे बाबत शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले. रुग्णालयास खनिकर्म मधून सोनोग्राफी मशीन मंजूर असून देखील अद्यापही प्राप्त न झाल्याने जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सोनोग्राफी मशीन लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले. तसेच रुग्णालयातील नादुरुस्त असलेली शवपेटी कार्यान्वित करण्यासाठी सिव्हिल सर्जन यांच्याशी संपर्क केला.

ग्रामपंचायत शिरोडा कार्यक्षेत्रातील अंतर्गत सविधा करिता खासदार सन्माननीय नारायण राणे साहेब यांचेशी चर्चा करून येथील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे श्रीम. रश्मी जोशी व श्रीमती श्रेया नवार या दोन महिला कर्मचारी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत असून त्या उत्तमपणे सेवा देत असल्याने त्यांच्या कामकाजाबाबत कौतुक केले व समाधान व्यक्त केले. Covid-19 अंतर्गत रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण केंद्रास भेट दिली व सदर रुग्णालयाने उभारलेल्या सेल्फी पॉइंट चे कौतुक केले. जिल्हा परिषद उत्पन्न वाढीचा एक भाग म्हणून रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील जागेचा वापर करून त्या ठिकाणी व्यापारी तत्त्वावर कोणताही प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने रुग्ण कल्याण समिती मार्फत प्रस्ताव करण्यास सुचित करण्यात आले. रेडकर रिसर्च सेंटर रेडी या शासन मान्यताप्राप्त लसीकरण केंद्रास भेट देऊन लसीकरणाचा आढावा घेण्यात आला.

संध्याकाळच्या सत्रातपंचायत समिती वेंगुर्ला येथे भेट देऊन पंचायत समिती स्तरावरील कामकाजाचा आढावा घेतला यामध्ये विविध विभागाकडील वैयक्तिक लाभाच्या योजना व याचा लाभ लोकांनी घेतला का. अनुदान लाभधारकांच्या खात्यात जमा आहे का याची माहिती घेतली. मुळात काही लाभार्थी प्रस्ताव मंजूर होऊन सुद्धा आवश्यक बिल व बँक खाते नंबर देत नसल्याने अनुदान वर्ग करण्यात अडचणी येत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले यावर जिल्ह्यातील चालू असलेल्या योजनांचा पुन्हा एकदा आढावा घेऊन योजनांमध्ये बदल करण्यात येईल असे सांगितले. तसेच ज्या लाभार्थ्यांना लाभ मंजूर आहे त्यांनी दिनांक 30 एप्रिल 2021 पर्यंत लाभाची उचल करावी अन्यथा सदर लाभधारक याचा लाभ रद्द करून नवीन लाभार्थीस लाभ देण्यात येईल असे सांगितले.

वेंगुर्ला कॅम्प येथील नवीन पंचायत समिती इमारतीची पाहणी केली सदर नवीन इमारतीमध्ये अभिलेख कक्ष छोटा असल्याचे निदर्शनास आले त्यावर अध्यक्ष यांनी वरील मजल्यावर अभिलेख कक्ष, पंचायत समिती इमारतीस कंपाऊंड वॉल व इमारतीचे मध्यभागी छप्पर याचा आराखडा व अंदाजपत्रक बनवून सादर करण्याचे सूचना गटविकास अधिकारी उमा पाटील यांना दिला. पंचायत समिती वेंगुरला नवीन इमारत उद्घाटन कार्यक्रम कोरोना पाश्वभूमीवर विलंब होत असल्याचे लक्षात आल्याने सदर चे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने किंवा अत्यंत साधेपणाने करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करणार असल्याचे सांगितले.शिवाजी प्रागतिक शाळा वेंगुरला नवीन इमारत बांधकामाची पाहणी करण्यात आली.
अध्यक्ष यांच्या दौरा कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश रावळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खलीपे, गटविकास अधिकारी उमा पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती माईणकर, अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक श्रीमती तांडेल उपस्थित होते.

अभिप्राय द्या..