येत्या दोन-तीन महिन्यात धडकी भरवुन दाखवू; संजय आग्रे निष्ठेने पक्षात काम करत आहेत.;सतिश सावंत

येत्या दोन-तीन महिन्यात धडकी भरवुन दाखवू; संजय आग्रे निष्ठेने पक्षात काम करत आहेत.;सतिश सावंत

कणकवली /-

शिवसेनेत माझे सहकारी संजय आग्रे आणि मी एकत्रित प्रवेश केला.आम्ही शिवसेनेच्या निष्ठेने काम करत आहोत. फोंडाघाट विभागात संजय आग्रे संघटनात्मक बांधणी करत विरोधकांना रोखण्यासाठी मजबूत शिवसेना केली आहे. त्याची धडकी नितेश राणे यांनी घेतली आहे. म्हणूनच काही माध्यमांना हाताशी धरून बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेनेला धडकी भरवणारे कोणीही जन्माला आले नसल्याचा टोला सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. फोंडघाट येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रामदास विखाळे, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, माजी सभापती संदेश पटेल, आनंद मर्ये यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.त्यावेळी विरोधकांवर त्यांनी निशाणा साधला आहे. कणकवली देवगड वैभववाडी या तिन्ही तालुक्यांमध्ये शिवसेना विविध विकास कामे व शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या माध्यमातून मजबूत संघटना बांधत आहे. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला धडकी भरवण्याची भाषा करू नये.येत्या दोन-तीन महिन्यात धडकी भरवण्याची भाषा करणाऱ्यांना आम्हीच धडकी भरवू, असा इशारा देखील सतीश सावंत यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..