वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी आलेल्या अहवालात एकूण १८ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती वेंगुर्ले तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये शहरी भागात ८ व्यक्ती व ग्रामीण भागात १० व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आल्या आहेत.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ८ व्यक्ती,होडावडा २,
कुशेवाडा ३,खानोली ४ व वजराट १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.