वेंगुर्ला /-
भाजपाच्या प्रयत्नाने वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी – नांदरुख वाडीतील केळुसकर कुटुंबियांचे घर दहा वर्षांनी प्रकाशमान झाले,अशी माहिती भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी दिली. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील नांदरुखवाडी मधील सदाशिव शांताराम केळुसकर यांना सन २०११ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शासकीय योजनेची मदत व इतरांकडून मदत घेऊन त्यांनी घर उभे केले.परंतु घरामध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी सात पोलची आवश्यकता होती . त्यामुळे ऐवढे पोल स्वखर्चाने उभे करून घरात लाईट आणने अशक्य होते.त्यामुळे गेली दहा वर्षे हे कुटुंब रॉकेलच्या दिव्यावर जिवन जगत होते . त्याच परीस्थितीत त्या कुटुंबांतील दोन मुली व एक मुलगा यांचे शिक्षण दिव्याच्या उजेडात चालू ठेवले.गेल्या वर्षी सदाशिव केळुसकर यांची पत्नी सविता केळुसकर ही आपली समस्या घेवून भाजपा कार्यालयात आली व त्यानंतर गेले वर्षभर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करुन शासकीय योजनेचा लाभ घेऊन त्यांना लाईट जोडून देण्यात आली.
या कामी एम.एस.ई.बी.चे उपकार्यकारी अभियंता एल.बी.खटावकर यांनी मोलाची भुमिका बजावली व कनिष्ठ अभियंता गणेश तोंडले यांनी पण सहकार्य केले .शासनाच्या एनएससी (NSC) या योजने अंतर्गत ग्राहकाकडुन कोणताही मोबदला न घेता सात पोलची उभारणी करुन या गरीब कुटुंबाची अडचण दुर केली . त्यामुळे कुटुंबियात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.घरामध्ये लाईट पोहचल्यावर भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व तालुक्यातील पदाधिकारी यांनी ट्युब लाईट व विद्युत साहीत्य भेट दिले.तसेच मिठाई वाटुन आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपाचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , किसान मोर्चा ता.अध्यक्ष बापु पंडित, शक्ती केंद्र प्रमुख शामसुंदर मुणनकर, उपसरपंच हर्षद साळगांवकर , ग्रा. पं.सदस्य सतिश कामत व ग्रामस्थ उपस्थित होते.