कणकवली /-
सावंतवाडी नगरपरिषदेवर होणारे खोटे आरोप बंद करावेत नाहीतर तुमचे भ्रष्टाचार बाहेर काढले तर पळता भुई होईल असा टोला अजय गोंदावले यांनी शिवसेना जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांना लगावला. ते पुढे म्हणाले वाॅटर एटीएमची त्यांनी जरूर चौकशी लावावी, दुध का दुध पानी का पानी होईल अशी प्रसिध्दी पत्रकाद्वारे अजय गोंदावळे यांनी टिका केली आहे.
सावंतवाडी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी संकुलात कोणाचे बेनामी गाळे नातेवाईकांच्या नावावर आहेत; गेल्या पंधरा वर्षांत तुमची प्रॉपर्टी कशी वाढली हे बाहेर काढण्यास आम्हास भाग पाडू नका असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. मुंबई, पुणे यांच्यासह विदेशात दुबई येथे तुमची प्रॉपर्टी कशी वाढली हे सावंतवाडीतील जनतेला चांगलेच ठावूक आहे. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे. त्यामुळे आता तरी देवाला स्मरून चांगली कामे करावीत, आपण स्वतः विश्वस्त असलेल्या नगरपालिकेची बदनामी करू नये. असा सल्ला देखील दिला आहे. फक्त टक्केवारी माहित असलेल्या रुपेश राऊळ यांच्यावर काय बोलणार असा टोला लगावत, टक्केवारीच्या नादात तुमच्या हातातील दोन ग्रामपंचायत गेल्या याचे थोडे तरी भान ठेवावे असा खरमरीत टोला लगावला आहे. तसेच शहरात बसविण्यात आलेल्या वॉटर ए टी एमची चौकशी जरूर लावावी, नक्कीच दूध का दूध पाणी का पाणी होईल असे देखील ते म्हणाले आहेत. २५ वर्ष सत्ता भोगल्या नंतर आता सत्ता गेल्याने विरोधक सैरभैर झाले असल्यानेच शहराची बदनामी करत आहेत. परंतु हे कितपत योग्य आहे असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.