कुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश पवार युवकाची आत्महत्या..

कुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश पवार युवकाची आत्महत्या..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश बापू पवार (वय ३०)या युवकाचा मृतदेह सरंबळ येथील विहीरीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची फिर्याद भाऊ रामचंद्र बापू पवार यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. अंकूश पवार हा मोटरसायकल घेऊन बाहेर जात होता. यावेळी आईने त्याला मोटरसायकल नेऊ नको पायीच जा असे आईने सांगितले.यावेळी तो पायी चालत आपल्या परड्यात जाऊन येतो असे सांगून गेला.बराचवेळ होऊनही आला नाही. शोध घेऊनही तो मिळाला नाही. त्यामुळे १८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वा. वडिलांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद कुडाळ पोलीस स्थानकात दिली.यानंतर रविवारी सकाळी १० वा नापत्ता भावाचा भाऊ रामचंद्र व वाडीतील लोक शोधाशोध करत असताना सरंबळ देऊळवाडी येथे सूर्यकांत कदम यांच्या मालकीच्या विहीरीत त्यांचा मृतदेह मृतदेह आढळून आला. अंकुश पवार यांने विहिरीच्या पाण्यात आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या घटनेची नोंद कुडाळ पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. या घटनेची फिर्याद भाऊ रामचंद्र पवार यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. त्याच्या पश्चात आई वडील तीन भाऊ व अन्य परिवार आहे.

अभिप्राय द्या..