सावंतवाडी /-
शहरात अचानक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ माजली व नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले सबनीस वाडा भागात मृत पावलेल्या व्यक्तीमुळे व कोरोना बाधित आढळल्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या विनंतीवरून भराडी पांदन या ठिकाणी कोरोना बाधितांच्या घरात व या पूर्ण परिसरातील घरोघरी कोरोना प्रतिबंधक फवारणी करण्यात आली तसेच या भागात ओम गणेश या इमारतीत सहा रुग्ण आढळल्यामुळे या संपूर्ण इमारतीच्या चारही विंग मध्ये व परिसरात आजूबाजूच्या इमारतींवर रस्त्यांवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली या उपक्रमात संतोष तळवणेकर तुषार बांदेकर सागर मळगावकर,आकाशमराठे,श्रीकांत कुडपे,प्रशांत मडगावकर,विश्वनाथ पास्ते व नागरिकानी आणि सहभाग घेतला तर आकेरी,कुडाळ शहर येथेदेखील कोरोना बाधितांच्या घरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी अचानक बोलवणे न करता एकदिवस अगोदर नागरिकांनी कळवावे अशी विनंती या टिंममार्फत करण्यात आली. संपर्क 9665662662
9403369103

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page