वैभववाडी /-
सैनिक पतसंस्था शाखा वैभववाडी कर्मचारी वैद्यकिय चाचणीत कोरोना बाधित आढळल्याने या पतसंस्थेच कार्यालय त्वरित निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय या संस्थेचे चेअरमन सुनील राऊळ यांनी घेतला माजी पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर यांनी संजू वीरनोडकर टीमच्या सहकार्याने सैनिक पथसंस्थेचे कार्यालय तसेच ईमारत लगतचा परिसर कोरोनाप्रतिबंधक फवारणी करून निरजंतुकीकरण केले. तसेच या टिंमने या भागाचे आमदार नितेशजीं राणे यांचे कार्यालय तेथिल नागरिकांची वर्दळ पहाता ते पण निर्जंतुकीकरण केले.आकाश मराठे,सागर मडगावकर यानी या कार्यात सहभाग घेतला. या टिंमच्या सेवाभावी कार्याबद्दल संस्थाचालक व नागरिकांनी कौतुक केले.