बांदा /-
बांदा भरवस्तीत असणारी बॅक ऑफ इंडिया यांचे शाखाधिकारीच कोरोना बाधित झाल्याने संपुर्ण बॅक कर्मचारीवृंदाची स्वॅब टेस्ट घेण्याच्या निमित्ताने दि.15 रोजी बॅक बंद ठेवण्यात आली .नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून संपूर्ण बँक, एटीएम हे संजू विरनोडकर टीम मार्फत सेनिटाईज करण्यात आली त्याचप्रमाणे भेडशी झरे बांबर येथेदेखील कोरोना बाधित नागरिक आढळल्याने त्याही वसाहतीत व बाधीतांच्या घरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली .या उपक्रमात दिपक सुतार,सागर मलगावकर, दोडामार्ग व भेडशी येथील युवकांनी सहभाग घेतला संजू विरनोडकर व टीमचे बँक ऑफ इंडियाचे अधिकारी नंदकुमार प्रभूदेसाई व बँक कर्मचाऱ्यांनी आभार मानले सतत एक वर्षाहून अधिक काळ कोरोना विरुद्ध संजू विरनोडकर टीम लढते आहे याबद्दल बांदा सरपंच अक्रम खान यांनीदेखील या टीमचं कौतुक करून धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page