महामंडळाच्या चालक वाहकांची कोरोना चाचणी खारेपाटण येथेच करा.;निलेश तेंडुलकर

महामंडळाच्या चालक वाहकांची कोरोना चाचणी खारेपाटण येथेच करा.;निलेश तेंडुलकर

कुडाळ /-

मुंबईहून एस टी महामंडळाचे बेस्ट साठी गेलेले सुमारे १२५ चालक वाहक व इतर कर्मचारी ३ ते ४ एस टी बसेस मधून कोणत्याही प्रकारची कोरोना चाचणी न करता सिंधुदुर्गात यायला निघाले आहेत . या चालक वाहकांची खारेपाटण चेक पोस्ट वर कोरोना चाचणी केल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश देऊ नये . हे चालक वाहक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आगारातील असल्याने ते आल्यानंतर आपआपल्या गावी बिनधास्त जाणार आहेत . सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक रजेवर असून अनेक आगर व्यवस्थापक हि जाग्यावर नाहीत .उद्या रविवार सुट्टीचा वार असल्याने कोणीही जबाबदार अधिकारी उपलब्ध असण्याची शक्यताहि कमीच आहे . १२५ कर्मचारी ३ ते ४ बसेस मधून येत असल्याने यामधील काही कर्मचारी जर पॉजिटीव्ह असले तर बाकीच्यांपर्यंत हा फैलाव व्हायला वेळ लागणार नाही. काही कर्मचारी इतर वाहनांनी सुद्धा येत आहेत रविवारी सकाळी मुंबईहून येणाऱ्या एस टी बसेस मधील कर्मचाऱ्यांची खारेपाटण येथे कोरोना चाचणी करूनच मग जिल्ह्यात प्रवेश द्यावा अशी मागणी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश तेंडुलकर यांनी केली आहे .

अभिप्राय द्या..