वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी (१५ व १६ एप्रिल रोजीच्या) आलेल्या अहवालात एकूण ३१ व्यक्तींचा कोव्हिड १९ (कोरोना) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालात आडेली फौजदारवाडी १,पलतडवाडी १,अणसुर २ व वेंगुर्ले शहर एरियात २ तसेच सायंकाळी उशिरा आलेल्या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात ७ व्यक्ती, आसोली १,मठ सिद्धार्थनगर ३,भंडारगाव २,वजराट देवसू ३,खानोली २,कामळेविर १,केळुस,१,शेळपी १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत. आज शुक्रवारी दुपारी आलेल्या अहवालांमध्ये वेंगुर्ले शहरातील ४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आल्या आहेत.