कुडाळ /-
कोरोना रुग्णांना चांगली सेवा मिळावी याकरिता प्रशासन कार्यरत असून कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात येत्या दोन ते तीन दिवसात 70 बेडचे कोव्हीड सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहे तसेच याठिकाणी तसेच कणकवली व मालवण येथील उपजिल्हा रुग्णालयात मिनी ऑक्सीजन प्लाँट ही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाची पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ व मालवण तालुक्याची आढावा बैठक घेतली. यानंतर कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे गेल्या वर्षी 24 टन क्षमतेचा ऑक्सीजन प्लांट सुरू केला होता त्यामुळे जिल्हा रूग्णालयात ऑक्सीजन पुरवठा कमी होत नाही आहे. आता ऑक्सीजन प्लांट बरोबरच व पाईपलाईन करण्यात येणार असून त्या करीता जिल्हा नियोजन मधुन निधी देण्यात येणार आहे. ऑक्सिजनचा तुटवडा त्यामुळे जाणवणार नाही.
कुडाळ येथील महिला रुग्णालयात तसेच कणकवली व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी मिनी ऑक्सीजन प्लांट सुरू करणार आहोत. कुडाळ महिला रुग्णालय येते 70 बेडचे तर मालवण पॉलिटेक्निक मध्ये सुरू असलेल्या 75 बेडच्या कोव्हीड सेंटर मध्ये बेडची क्षमता वाढविण्यात येणार आहे. कोरोना रूग्णांना आता 125 रुपयात जेवण मिळणार आहे.
कुडाळ व मालवण याठीकाणी प्रत्येकी दोन रुग्णवाहिका खनिकर्म विभागातून मंजूर करण्यात आल्या आहेत. सध्या कुडाळ तालुक्यात 320 तर मालवण तालुक्यात 174 असे कोरोना रुग्ण सक्रिय,आहेत,आतापर्यंत कुडाळ तालुक्यात सुमारे 12 हजार लोकांची स्वॅब तपासणी झाली त्यामध्ये सुमारे दोन हजार 18 कोरोना बाधीत आढळले तर मालवण तालुक्यात सुमारे 18 हजार जणांची झाली स्वॅब तपासणी झाली त्यामध्ये सुमारे 950 जण कोरोना बाधित आढळले. कुडाळमध्ये सुमारे लसीकरणाचा पहीला डोस 13 हजार जणांना देण्यात आला. तर दुसरा डोस 2 हजार 673 जणांना देण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राम कमिट्या कार्यान्वित करण्यात याव्यात या संदर्भात तहसीलदार यांना ही तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. सरपंचांच्या अडीअडचणीत बाबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कोरोना लढ्यात सक्रिय होऊन काम करताना कोरोनामुंळे कोणाचाही मृत्यू झाला व तसा अहवाल जिल्हाधिकारी यांनी दिला त्या व्यक्तींचा नावे 50 लाखाचा विमा देण्यात येईल. कोव्हीड पार्श्वभूमीवर खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले की वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, तसेच नर्स यांना सेवा देण्यासाठी घेण्यात येणार आहे. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात कामाची ऑर्डर देण्यात येईल. महाराष्ट्र राज्यात कोरोनाची तपासणी योग्य प्रकारे होत आहे. सर्व कारभार पारदर्शक आहे. इतर काही राज्यात मात्र कोरोनाच्या बाबतीतील गोष्टी झाकुन ठेवल्या जात आहे असे सांगितले.