कुडाळ /-
दिनांक 4मार्च रोजी वेंगुर्ल्यातुन पानदिवड जातीच्या सापाला घरातुन पकडल्यानंतर सापाने सोडण्यापुर्वीच बरणीमध्ये अंडी घातली होती.आणि अशा अवस्थेत काय करावं हा प्रश्न सिंधुदुर्गात वन्यजीवांसाठी काम करत असलेली कोकण वाइल्ड लाईफ रेस्क्यु फोरम सिंधुदुर्ग या संस्थेला पडला.सर्वांनुमते नंतर जिथे त्या सापाचा जास्त वावर असतो अशा ठिकाणी त्या सापाला अंड्यासकट सोडण्याचा निर्णय झाला.आणि सायंकाळी त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ठेवण्यात आलं. कोकण वाईल्ड लाईफची टीम त्या दिवड जातीच्या सापाच्या अंड्यावर २/४दिवस लक्ष ठेवून होते.पण हवा तसा प्रतिसाद सापाकडुन भेटला नाही.आणि शेवटी टीमने ती अंडी निसर्गाच्या सानिध्यात कुत्रिम रित्या कोकोपीटच्या सहाय्याने उबवण्याच ठरवलं.आणि शेवटी ४२दिवसाच्या कालावधी नंतर म्हणजे आज शनिवारी कुडाळ येथे त्याअंड्यातून १८ पिल्ले बाहेर आली.यासाठी मानद वन्यजीव रक्षक दप्तरदार सर, काका भिसे सर आणि कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक डाँ योगेश कोळी सर यांच या संदर्भात योग्य मार्गदर्शन लाभले. कोरोनाच्या काळात सुध्दा शासनाचे सगळे नियम पाळुन कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम, सिंधुदुर्ग संस्था अहोरात्र वन्यजीवांसाठी काम करतेय. या संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे (कुडाळ- पिंगुळी), उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर (मालवण- वायरी) सचिव वैभव अमृस्कर ( सावंतवाडी- आंबोली ),खजिनदार महेश राऊळ ( वेंगुर्ला- तुळस ) सहसचिव ओमकार लाड (मालवण- वराड ) सदस्य नंदु कुपकर ( मालवण- देवबाग ) आणि डॉ. प्रसाद धुमक ( कुडाळ तेरसे बांबार्डे)आदी आहेत. आज या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी कुडाळ चे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, वनरक्षक कोळेकर, कोकण वाईल्ड लाईफ चे अध्यक्ष अनिल गावडे, सचिव वैभव अमृस्कर, आणि सिध्देश ठाकुर आदी उपस्थित होते.