ॐ दत्त ठाकूर महाराज यांचे देहावसान..

ॐ दत्त ठाकूर महाराज यांचे देहावसान..

मसुरे /-

ॐ दत्त परिवाराद्वारे असंख्य भक्तगणांना प्रपंचात राहून परमार्थात रमायला शिकवणारे, नामस्मरणाच्या जोरावर अनेक संकटांवर मात करुन यशाकडे नेणारा मार्ग दाखवणारे परमपूज्य ओम दत्त श्री ठाकूर महाराज उर्फ मधुकर काशीनाथ ठाकूर (८० वर्ष )यांनी पुणे येथील सौदामिनी संकुल येथे देह ठेवला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रायगड जिल्ह्यातील उरण हे जन्मगाव असलेले परमपूज्य श्री ठाकूर महाराज यांनी ॐदत्त परिवाराची स्थापना केली आणि अनेक भक्तांना मार्गदर्शन करुन श्री दत्तगुरुंच्या महिम्याची प्रचिती दिली.श्री क्षेत्र गाणगापूर येथे दत्तगुरुंच्या चरणी श्री ठाकूर महाराज यांनी अनेक सेवा अर्पण केल्या. मुंबई,पुणे,गोवा,डोंबिवली ,रत्नागिरी ,ठाणे,रोहा व परदेशी मोठ्या प्रमाणावर ॐदत्त परिवाराचे अनुयायी आहेत. पश्चात पत्नी,एक मुलगा, मुलगी, सून , नातवंडे असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..