सिंधुदुर्ग जिल्हात करोनाचा फैलाव होण्यामागे जिल्ह्यातील परिवहन मंडळातील विभाग नियंत्रकाचा मोठा हाथ भार.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा आरोप..

सिंधुदुर्ग जिल्हात करोनाचा फैलाव होण्यामागे जिल्ह्यातील परिवहन मंडळातील विभाग नियंत्रकाचा मोठा हाथ भार.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा आरोप..

कुडाळ /-

सध्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये दिवसेदिवस करोनाचा फैलाव जोरात होत असून,मुंबईला पाठवलेल्या एसटी ड्राइवरची मुंबई वरून आल्या वर कुठल्या प्रकारची काळजी घेतली जात नसून, त्यांना ड्युटी वर कुठल्याही प्रकारची टेस्ट न घेता किव्हा घेतली गेल्यास रिपोर्ट यायच्या आत त्याना जबरदस्तीने कामावर पाटवले जात आहे.असें कर्मचारी जेव्हा बसेस घेऊन प्रवासी वाहतूक करतात तेव्हा त्यांना करोना झालेला असल्यास तो प्रवाश्यांना होणे सहज शक्य आहे.

फक्त पैसे कमवायचा नादात हा विभाग नियंत्रक सगळ्या डेपो च्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन प्रवाश्यांच्या जीवाशी खेळत आहे.आधीच रिटायर्ड झालेल्या आकार्यश्रम अधिकार्याला महामंडळ का पोसतोय हेच समजत नाहीं आहे,हा अधिकारी कोणाचा जावई आहे ह्याचा शोध लावणे गरजेचे झाले आहे.महामंडळला कडे पैसा नाहीत सध्या गाड्या चालवायला,अश्या परिस्थिती मध्ये ह्या बिनकामी बुजगावण्याला का बसवलाय खुर्चीवर,अश्या अधिकार्यावर लवकरात लवकर कारवाही करावी अशी मागणी आज शुक्रवारी कुडाळ येथे मीडियाशी बोलताना मनसेचे महाराष्ट्र राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..