ऑनलाइन गीत गायन स्पर्धेत संकल्प चौकेकर प्रथम कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्गचे आयोजन..

ऑनलाइन गीत गायन स्पर्धेत संकल्प चौकेकर प्रथम कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्गचे आयोजन..

मसुरे /-

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .संपूर्ण जिल्हाभर या स्पर्धेला चांगला प्रतिसाद प्राप्त झाला.स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.प्रथम क्रमांक -संकल्प प्रदिप चौकेकर, (ओसरगाव बौद्धवाडी ),
द्वितीय – साहिल सत्यवान परब (तिवरे खालची ),
तृतीय -मानसी महेश लाड, (फोंडा गांगोवाडी ),
उत्तेजनार्थ -मिताली मुकेश तांबे (ओसरगाव बौद्धवाडी )
उत्तेजनार्थ -बंदिश नागेश साळुंके (मुटाट ),
उत्तेजनार्थ -प्रांतिय राजेंद्र कोलते( कुर्ली वसाहत).
स्पर्धेत विजयी झालेल्या प्रथम तीन स्पर्धकांना अनुक्रमे रुपये सातशे, रुपये पाचशे व रुपये तीनशे याप्रमाणे रोख रक्कम व सन्मानपत्र विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत.
देशातील लोकशाही शासनव्यवस्था ज्या भारतीय संविधानावर चालते त्याचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील विविध पैलूंचे प्रकटन विद्यार्थी जयंतीदिनी सादर करतात.कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांची ही संधी त्यांना ऑनलाईन गीत गायनामुळे प्राप्त झाली असे यावेळी किशोर कदम म्हणाले. प्राप्त झालेल्या ऑनलाईन व्हिडिओंचे संगीतातील तज्ज्ञ विद्रोही जलसाकार सिनैस्टार सुदिन तांबे परीक्षकांमार्फत परीक्षण करण्यात आले .स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संघटनेच्या तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते
सर्व यशस्वी स्पर्धक व सहभागी यांचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कदम ,जिल्हा सचिव विकास वाडीकर ,कणकवली तालुका अध्यक्ष संदीप कदम , नेहा कदम सचिव जिल्हा उपाध्यक्ष विद्यानंद शिरगावकर ,देवगड तालुकाध्यक्ष सूर्यकांत साळुंके, तालुका सचिव संतोष क्षिरसागर यांनी अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..