वेंगुर्ला/ –
जिनियस फाऊंडेशन व वर्ल्ड रेकॉर्ड इंडीया या दोन संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणांत सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष हा जागतिक स्तरावरील मानाचा पुरस्कार वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन लक्ष्मण गिरप यांना गुढी पाडवा दिनी म्हणजे १३ एप्रिल रोजी जाहिर करण्यात आला आहे.
जिनियस फाऊंडेशन व वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थानी जगातील स्वच्छता सेवासह सर्व प्रकारच्या शासनाच्या स्वच्छतेचे नियम पाळून जनतेला सेवा दिलेल्या आहे. अशा सर्व सेवांचे सर्व्हेक्षण केले गेले. या सर्व्हेक्षणासाठी महाराष्ट्राकरिता संजय विलास नार्वेकर व सुषमा संजय नार्वेकर यांना नियुक्त केले होते. या टीमने सर्वोत्कृष्ट लोकसेवा, कोकण विभागातील कला दालन, शुन्य कचरा व्यवस्थापन, कचरा डेपोचे सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन, बहुस्तरीय कचरा विलगीकरण, प्लॅस्टिक बंदीच्या नियमांची कडेकोट पालन, प्लास्टिकचा वापर करून टीकावू रस्ते या केलेल्या कामाची पाहणी केली. हि सर्व कामे सर्व्हेक्षणांत पाहणी करून नंतरच त्यांना योग्य वाटल्याने वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया संस्थकडे सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना वर्ल्ड रेकॉर्ड इंडीया या संस्थेचा जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष पुरस्कार जाहिर केला आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेच्या इतिहासात हा जागतिक स्तरावरील मानाचा तुरा ठरला आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वर्ल्ड रेकॉर्ड इंडीया या संस्थेने वेंगुर्ला नगरपरिषदेच्या या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करूनच वेंगुर्ले नगरपरिषदेस जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष हा मानाचा पुरस्कार जाहिर केलेला आहे.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page