दोडामार्ग /-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिले असून देखील दोडामार्ग शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत असून यावर आळा घालणे अतिशय आवश्यक आहे,हेच कारण लक्षात घेता
पोलीस प्रशासनाने आज गुरुवारी १७ जणांवर कडक कारवाही करत ३४oo रुपयांचा दंड पोलीस कॉन्स्टेबल – आशिष लवानदरे, स्वप्नील पांगम, महिला पोलीस कॉन्स्टेबल हरमलकर यांनी कारवाही करत दंड वसूल केला.