कुडाळ /-
गेल्या दोन दीवसापुर्वि अचानक आलेल्या विजेच्या कडकडासह पावसामुळे वालावल कोडबसवाडी येथील रघुनाथ चंद्रकांत हळदणकर यांच्या रहात्या घरावर माड पडुन घर पुर्णतः जमिनदोस्त झाले असुन शासनाने त्वरित या गरीब कुटुंबाला मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी पालकमंत्री ना उदय सामंत खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या कडे केली आहे.रघुनाथ हळदणकर यांचे वडील गेल्या तीन वर्षापूर्वी ओरोस येथे जैतापकरच्या माड बागायती मधी नारळ पाडावकिचे काम करताना माडावरून पडुन मृत्यु पडले होते तर रघुनाथ हळदणकर सध्या कुडाळ तहसीलदार यांच्या गाडीवर रोजंदारीवर ड्रायव्हर म्हणून काम करीत असतो त्याची आई आजारपणामुळे घरातच असते अगदी हलाकिचे जिवन जगत असताना गेल्या सोमवारी वादळी वा-यासह आलेल्या पावसाने अचानक घरावर माड कोसळला यावेळी त्याची आई बालाबाल वाचली राहत्या घराचे होत्याचे नव्हते झाले आहे म्हणून तात्काळ या गरीब कुटुंब असलेल्या हळदणकर यांना तातडीने मदत व्हावी अशी मागणी बंगे यांनी करुन अक्षरशः निवा-यातुन बेघर झालेल या कुटुंबाला आधार देण्यात यावा अशीही मागणी बंगे यांनी केली आहे.दरम्यान वालावल तलाठी परमेश्वर सलगरे यांनी पंचयादी करुन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांच्या कडे पाठवलेली आहे.