राष्ट्रीय काँग्रेसकडून रक्तदान शिबिराचे आयोजन.;जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती

राष्ट्रीय काँग्रेसकडून रक्तदान शिबिराचे आयोजन.;जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती

सावंतवाडी /-

भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंधूदुर्ग जिल्हा कॉग्रेस ने सावंतवाडी येथील जिल्हा कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात जे कोरोना ग्रस्थ रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी रक्त गरजेचे असल्याने जिल्हा कॉग्रेस च्या माध्यमातून रक्तदान शिबिराच आयोजन केले आहे. काल 1 तारीख महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्त कोविड ग्रस्तासाठी हेल्पलाईन सेवा ही सुरू केली जे कोविड ग्रस्त आहेत त्याना कॉग्रेस कडून मदत मिळणार आहे. केंद्रातील भाजप सरकार ने कोविड लस देण्यासाठी महाराष्ट्रासोबत जो दूजाभाव केला ,आणि महाराष्ट्रातील जनतेला जो त्रास दिला त्यामुळं उद्या जिल्हा कॉग्रेस च्या माध्यमातून भाजप सरकार चा जाहीर निषेध करण्यात येणार आहे शासनाच्या नियमांचं पालन करून या कार्यक्रम चे आयोजन करणयात येणार आहे असे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी मीडियाशी बोलताना सागितलं आहे.

अभिप्राय द्या..