कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यात सहभागी असलेल्या जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याचा आज झाला मृत्यू..

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यात सहभागी असलेल्या जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याचा आज झाला मृत्यू..

कणकवली /-

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी ९ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौरा केला होता.या दौऱ्यात त्यांच्यासोबत सहभागी असलेल्या जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याचा आज मृत्यू झाला. त्यांच्यावर शहरातील खासगी कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते.

कृषी मंत्र्यांचा दौरा आटोपल्यानंतर त्या कृषी अधिकाऱ्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्याला शहरातील एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याला कोविड वॉर्ड मध्ये हलवून उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र आज उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी असलेले इतर अधिकारी, राजकीय नेतेमंडळी आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण आहे.कृषीमंत्री दादा भुसे यांनी ९ एप्रिल रोजी खारेपाटण, नांदगाव, कणकवली, ओरोस, कुडाळ आदी ठिकाणी जाऊन शेताच्या बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी राजकीय पक्षाची नेतेमंडळी आणि जिल्ह्यातील शेतकरीही यावेळी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..