आंबेरी मध्ये महिला पोलीस कमाचाऱ्याने दिले खारू ताईच्या पिल्लाला जीवदान..

आंबेरी मध्ये महिला पोलीस कमाचाऱ्याने दिले खारू ताईच्या पिल्लाला जीवदान..

मसुरे /-

मालवण तालुक्यातील आंबेरी गोसावीवाडी येथील पशु मित्र आणि मालवण पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस म्हणून कार्यरत असणाऱ्या दिया दिगंबर गोसावी यांनी आज संध्याकाळी ६ च्या सुमारास आपल्या राहत्या घरी घरावरून पडलेल्या खारुताईच्या एका जखमी पीलाला औषधोपचार करून जीवदान दिले असून खारुताई चे पिल्लू व्यवस्थित बरे झाल्यानंतर तिला पुन्हा तिच्या घरट्यामध्ये सुरक्षित सोडले. दिया गोसावी आणि तिच्या परिवाराने केलेल्या परिश्रमाचे सर्वत्र कवतुक होत आहे…
नेहमी असे म्हटले जाते की पोलीस सुद्धा सर्वांचा मित्र असतो पोलीस पोलिसाला सुद्धा मन असतं आणि ह्याची प्रचिती दिया गोसावी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास आंबेरी येथील त्यांच्या राहत्या घराला लागून असलेल्या एका घरट्यातून खारुताई चे पिल्लू खाली पडलं आणि त्याचं कमी झालं होतं गोसावी आणि त्यांच्या परिवाराच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी त्वरित त्या खारुताईच्या पिल्लाला औषधोपचार केले. दूध पाणी वगैरे त्या पिल्लाला पाजलं आणि ते पिल्लू पूर्ण बरे झाल्यानंतर त्वरित त्या पिल्लाला घराला लागून असलेल्या खारुताईचा घरट्यामध्ये नेऊन सोडलं. यावेळी तिथे असणारी त्या पिल्लाची आई सुद्धा पिल्लाला पाहून आनंदित झाली. या वेळी खारुताईच्या पिल्लाला जखमी अवस्थेत मदत करण्यासाठी गंधार गोसावी,मेघा महादेव गोसावी,प्रथमेश महादेव गोसावी आणि गोसावी परिवार सुद्धा सहभागी झाला होता.

अभिप्राय द्या..