थोडी कळ सोसा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आठदिवसाचा लाॅकडाउनचा कडक इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई /-
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण विविध उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येतेय. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री करत आहेत. राज्यात लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.*
*बैठक सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही अस ठोस मत व्यक्त केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित निर्णय घेण्याची ही वेळ आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. तर कोव्हिडसाठी ९६० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून अध्याप १२०० मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात रेमडिसीव्हरचा तुटवडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.*
*बैठकीतले महत्वाचे मुद्दे :-*
*लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही :- उद्धव ठाकरे*
*रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आलीये रेमडेस्विर आणि ऑक्सिजनचा तुटवडा*
*ऑक्सिजन, बेड लवकर उपलब्ध करा :-फडणवीस*
*रेमडेस्विर तात्काळ द्या :- फडणवीस*
*मागचं वर्ष वाया गेलं :-फडणवीस*
*राज्य सरकाराल पुर्ण सहकार्य करु :- फडणवीस*
*निर्बंध असायला हवे पण उद्रेक लक्षात घ्या*
*कडक लॉकडाऊनची गरज नाहीतर १५ तारखेनंतर भीषण परिस्थीती,सरसकट लीकरणाची गरज,तसेच सगळ्यांनी एकत्र यायची गरज, राजकारण करु नका :- मुख्यमंत्री ठाकरे*
*राज्याचं कर्ज वाढलं तर वाढू द्या :-फडणवीस*