बिबट्याकडून गाईच्या वासराचा फडश्या चाफेखोल येथील घटना; ग्रामस्थ भयभीत..

बिबट्याकडून गाईच्या वासराचा फडश्या चाफेखोल येथील घटना; ग्रामस्थ भयभीत..

मालवण /-
मालवण तालुक्यातील चाफेखोल गावातील शेतकरी सदानंद संभाजी घाडीगावकर यांच्या मालकीची २ वर्षाच्या गाईच्या वासराचा शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास बिबट्या वाघाने फडश्या पाडला यात वासराचा जागीच मृत्यू झाला . चाफेखोल परिसरात गेले काही दिवस बिबट्या वाघाचा वावर ग्रामस्थाना दिसून आला होता. शुक्रवारी घडलेल्या घटनेने ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. गायीचे वासरू मृत्यूमुखी पडलेल्या घटनास्थळी सायंकाळी उशीरा या क्षेत्रातील वनपाल, वनरक्षक यांनी पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी भक्षक बिबट्या वाघाचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे..

अभिप्राय द्या..