वेंगुर्ला /-

वेंगुर्ले शहरातून जाणाऱ्या रेडी – रेवस मार्गावरील खोदलेले चर कायमस्वरूपी डांबरीकरण करून बुजविण्यात यावेत.येत्या ८ दिवसात सदर चर डांबरीकरण करुन कायमस्वरूपी न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ भाजपातर्फे वृक्षारोपण करण्यात येईल,असा इशारा भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता वेंगुर्ले याना निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,रेडी – रेवस महामार्गावरील वेंगुर्ले शहरामध्ये भुयारी विद्युतीकरणासाठी खोदाई करण्यात आली आहे.सदर रस्त्यावर विद्युत लाईन टाकण्याचे काम पुर्ण होऊनही अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर चर कायमस्वरूपी बुजविण्यात न आल्याने वारंवार अपघात होत आहेत.वेंगुर्ले शहर हद्दीत एस.टी.स्टॅंड , साईमंगल कार्यालय समोर,पिराचा दर्गा, सातेरी काॅम्पेल्स समोर, दाभोली नाका,निमुसगा या ठिकाणची परिस्थिती फारच गंभीर आहे.
तक्रार केल्यावर तात्पुरती माती टाकून चर बुजवून मलमपट्टी करण्याचे काम संबंधित खाते करत आहे.परंतु सदर रस्त्यावर वाहतूक जास्त असल्याने पुन्हा चरांची अवस्था ‘ जैसे थे’ च होते.त्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास होतो.याबाबत येत्या ८ दिवसात सदर चर डांबरीकरण करुन कायमस्वरूपी न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ भाजपातर्फे वृक्षारोपण करण्यात येईल,असा इशारा भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page