व्यापारी आपली व ग्राहकांची काळजी घेईल या लाॅकडाऊन काळात व्यापारी वर्गाला सवलत द्या,;संतोष शिरसाट

व्यापारी आपली व ग्राहकांची काळजी घेईल या लाॅकडाऊन काळात व्यापारी वर्गाला सवलत द्या,;संतोष शिरसाट

कुडाळ /-

व्यापारी आपली व ग्राहकांची कोरोनाचे सर्व नियम पाळुन काळजी घेईल परंतु पुन्हा लाॅकडाऊन करु नका अशी विनंती पालकमंत्री ना उदय सामंत यांच्या कडे कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट यांनी केली आहे.

या वेळी शिरसाट यांनी आजच पालकमंत्री ना उदय सामंत यांना विनंती करताना सांगितले कि आदीच गेले वर्षभर लहान मोठे व्यापारी या कोरोना काळातील लाॅकडाऊन मुळे मेटाकुटीस आला असताना शासन आमची काळजी म्हणून कोरोना पासुन वाचविण्यासाठी अनेक उपाययोजना आखत आहे परंतु आता लाॅकडाऊन झाल्यास व्यापारी पुर्णतः मेटाकुटीस येणार आहे अशावेळी आपली आणि ग्राहकांची जबाबदारी म्हणजेच अटी व शर्तीचे थोडे नियम शिथिल करुन व्यापारी वर्गाला मुभा द्यावी अशी मागणी शिरसाट यांनी करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेत असताना व्यापारी वर्गाचा विचार व्हावा अशी विनंती श्री शिरसाट यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..