अपघात करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटर सायकलस्वार दिनेश तुळसकर याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल

अपघात करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटर सायकलस्वार दिनेश तुळसकर याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल

कुडाळ /-

अपघात करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटर सायकलस्वार दिनेश तुळसकर रा वालावल ता. कुडाळ याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेर्सेबांबर्डे येथे महामार्गावर ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१५ वा हा अपघात घडला होता. यातील सुरेश वायदंडे, महादेव वायदंडे व अन्य एक असे तिघे दरम्यान ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१५ वा. हे तिघही झाडूचा पाला बनविण्याचा पाला गोळा करण्याचे काम आटोपून आपल्या तेर्सेबांबर्डेतील वास्तव्याचा ठिकाणी जात होते. यादरम्यान कुडाळकडे जाणार्‍या एका भरधाव वेगातील एका मोटरसायकल स्वाराची यातील महादेव वायदंडे यांनी ठोकर बसली. यानंतर त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून बेळगाव येथे अधिक उपचारासाठी हलवत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी भरधाव वेगात वाहन चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कुडाळ पोलिसात दिनेश तुळसकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची फिर्याद कुडाळ पोलिसात सुरेश वायदंडे यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ढोबळे करत आहेत.

अभिप्राय द्या..