आंजिवडे येथील कृष्णा पंदारे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

आंजिवडे येथील कृष्णा पंदारे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षात केले स्वागत..

कुडाळ /-

आंजिवडे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पंदारे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. आंजिवडे येथील सातेरी मंदिर येथे आ.वैभव नाईक यांनी प्रवेश कर्त्यांना शिवबंधन बांधून, पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.शिवसेनेत प्रवेश केलेल्यांचा पक्षात योग्य मान सन्मान केला जाईल आपल्या विभागात पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांनी मेहनत घ्यावी असे आ. वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आंजिवडे येथील प्रकाश पंदारे, योगेश पंदारे, भावेश करवडे, तुळसाजी पंदारे, दशरथ नाटेकर, जयवंत परब, भागवती परब, शरद करवडे,आदी ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी जि.प. सदस्य राजू कविटकर ,शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभाग प्रमुख रामभाऊ धुरी, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, वसोली, उपवडे,आंजीवडे,साकिर्डे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अजित परब, सागर म्हाडगूत, श्री. कदम, सदानंद गवस, दिगंबर तवटे, श्रीकृष्ण परब, सुधाकर बांदेकर, संतोष राऊळ, श्रीनिवास करिवडेकर राघू शेडगे, बापू राऊळ, अँड. सुधीर राऊळ, दीपक नाईक, संतोष राऊळ, मदन रेमुळकर, शामु सपकाळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..