कुडाळ /-
कुडाळ शहरातील शिवाजीनगर येथील रोहित कारेकर (वय 30 ) या तरुणाचे आज गोवा येथे सकाळी दुःखद निधन झाले गेले काही महिने तो कावीळ आजाराने त्रस्त होता त्याला तीन दिवसांपूर्वी कुडाळ येथून गोवा येथे दाखल करण्यात आले होते.त्याच्या या दुःखद निधनाने कारेकर कुटूंबीयासह दैवज्ञ समाजावर दुःखाचा डोगर कोसळला आहे चार वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते दैवज्ञ समाजाच्या कार्यक्रमात तो हिरीरीने भाग घेत असे हसतमुख चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्याची ओळख होती त्याच्या पाठीमागे आई वडील पत्नी व साडे तीन वर्षाची मुलगी आहे आज दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.