वर्दे,आवळेगाव,तेंडोली, चेंदवण, तेर्सेबांबर्डे गावात झाला कामांचा शुभारंभ.

कुडाळ /-

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून वेगवेगळ्या योजनांमधून कुडाळ तालुक्यातील वर्दे, आवळेगाव, तेंडोली, चेंदवण, तेर्सेबांबर्डे या गावांमध्ये विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शनिवारी श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यामध्ये वर्दे येथील फातरीचे गाळूवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे व स्ट्रीटलाईट बसविणे , आवळेगाव येथील चव्हाणवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, आवळेगाव फौजदारवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, आवळेगाव कुंभारवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, तेंडोली बागलाचीराई येथे साकव बांधणे, बजेट अंतर्गत १ कोटी २६ लाख निधीतून तेंडोली केळूस रस्ता नूतनीकरण करणे, तेर्सेबांबर्डे साटेलकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, व चेंदवण मळेवाडी जेटी विस्तारीकरण या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी वर्दे येथे जि.प. गटनेते नागेंद्र परब,विभाग प्रमुख पप्पू पालव, संदीप सावंत, अपर्णा सुतार, अनुराग सावंत, दिव्या सावंत, सुलक्षणा वळंजू, विष्णू सावंत, सुनील सावंत, बाळा कुंभार, रुपेश सावंत, कमलाकर पवार तेंडोली येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,विकास कुडाळकर, रुपेश पावसकर, विभाग प्रमुख संदेश प्रभू, रुपेश पावसकर, संदीप राऊळ, मंगेश प्रभू, संजय प्रभू विजय प्रभू, रतन धुरी
आवळेगाव येथे संकेत सावंत, नितीन सावंत, विवेक कुपेरकर, पांडुरंग कासार, दिनेश परब, अरविंद दळवी, विजय पवार,चेंदवण येथे सरपंच उत्तरा धुरी, कवठी सरपंच रुपेश वाडयेकर, ग्रामसेवक श्री.राणे, बाळा धुरी, भालचंद्र पिळणकर, नारायण तोरसकर, अविनाश शिंगारे, रमाकांत तोरसकर, प्रशांत चेंदवणकर, भुपेश चेंदवणकर,तेर्सेबांबर्डे येथे प्रसाद साटेलकर, प्रदीप साटेलकर, मंगेश परब, अशोक बांबर्डेकर, अजित साळगावकर, दादा साटेलकर, शिवराम साटेलकर, संजय साटेलकर, जीजी साटेलकर, अण्णा साटेलकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page