काजुचे झाड तोडणेवरून साळगाव येथे दोन गटात हाणामारी.; दोन्ही गटातील सहा जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल..

काजुचे झाड तोडणेवरून साळगाव येथे दोन गटात हाणामारी.; दोन्ही गटातील सहा जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल..

कुडाळ /-

कुडाळ दोन्ही गटातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काजुचे झाड तोडणे वरून साळगाव येथे दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटातील सहा जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या हाणामारी प्रकरणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
साळगाव येथे घडलेल्या हाणामारीत वसंत तुकाराम गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, दत्ताराम लाड यांनी माझ्या जमिनीतील काजुचे झाड तोडत असताना त्याला विचारण्यासाठी गेलो असता दत्‍ताराम शंकर लाड, गुंडू शंकर सावंत, सचिन गुंडू सावंत, नारायण जगन्नाथ सावंत यांनी मला व माझा मुलगा विनय गायकवाड याला दांड्याने मारहाण केली. तर दत्ताराम शंकर लाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझ्या जमिनीतील काजुचे झाड गुंडू सावंत हे तोडत असताना वसंत गायकवाड व त्यांचा मुलगा विनय गायकवाड हे दांडा घेऊन आले व शिवीगाळ करून मारहाण केली या दोन्ही तक्रारी परस्परविरोधी कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गटातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..