कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात पुन्हा १४ कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ येथे ०८, चेंदवण ०१, ओरोस ०२, धुरिटेम्ब नगर ०१ ,गोठोस ०२,असे एकूण १४कोरोना चे रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 675एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 649 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 26 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १५९२एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले १४६९ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ७१ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०९ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४३ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.