कुडाळ हायस्कूल इंग्लिश माध्यमाच्या शाळेला डॉ.अनिल नेरुरकर हे नाव देऊ नका या मागणीसाठी शहरातील नागरिक आक्रमक..

कुडाळ हायस्कूल इंग्लिश माध्यमाच्या शाळेला डॉ.अनिल नेरुरकर हे नाव देऊ नका या मागणीसाठी शहरातील नागरिक आक्रमक..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ हायस्कूल इंग्लिश माध्यमाच्या शाळेला डॉ. अनिल नेरुरकर हे नाव देऊ नका या मागणीसाठी शहरातील नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी कुडाळ हायस्कूलच्या संस्थाचालकांना चांगला जाब विचारला अखेर संस्थाचालकांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित करून डॉ. अनिल नेरूरकर यांचे नाव झाकोळण्याची हमी देऊन हे प्रकरण तात्पुरत्या स्वरूपात थंड केले.
कुडाळ हायस्कूलच्या प्रशासना संदर्भात आणि डॉ. अनिल नेरुरकर यांच्या संदर्भात कुडाळ शहरातील अनेकांच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक या सोशल मीडियवर एक निनावी पत्र फिरत होते या पत्रामध्ये डॉ. अनिल नेरुरकर यांच्या संदर्भात अश्लील मजकूर तसेच संस्था चालकांकडून केला जाणारा अपहार हे या पत्रात नमूद केले होते या पत्राच्या आधारावर कुडाळ शहरातील नागरिकांनी आज (गुरुवारी) श्री देव मारुती मंदिराच्या धर्मशाळेत बैठक घेतली. यावेळी अभय शिरसाट, विनायक राणे, राजन नाईक प्रसाद धडाम, बंड्या सावंत, प्रसाद शिरसाट, सुंदर सावंत, श्रीराम शिरसाट, सदासेन सावंत, अस्मिता बांदेकर, गणेश भोगटे, आनंद शिरवलकर, गोविंद सावंत, आबा धडाम, संदेश पडते, आनंद शिरवलकर, गिरीश काणेकर, सचिन काळप, नागेश नेमळेकर, बाबी बांदेकर, नितीन म्हाडेश्वर उपस्थित होते.

या बैठकीत असे ठरविण्यात आले की या पत्राची शहानिशा करण्यासाठी एक प्रत पोलिस ठाण्यात चौकशीसाठी दिली जावी आणि त्यानंतर यासंदर्भात संस्थाचालकांना जाब विचारला जावा असे ठरले या बैठकीमध्ये अनेक मुद्दे उपस्थित झाले या शाळेमध्ये दहावी किंवा बारावी मध्ये नापास झालेल्या मुलांच्या पुन्हा पेपर तपासणी वेळी शाळेच्या काही संस्थाचालकांकडून मागितले जाणारे पैसे याची सुद्धा चर्चा मनोहर कामत यांनी केली त्यानंतर या बैठकीला उपस्थित असलेल्या २०० ते २५० नागरिकांनी कुडाळ पोलीस ठाणे गाठले पोलीस ठाण्यामध्ये या पत्राची प्रत देऊन हे पत्र कोणी आणि कोणत्या पुराव्याच्या आधारे हे पत्र लिहिले आहे याची चौकशी करावी अशी मागणी कुडाळ पोलिसांकडे शहरवासीयांनी केली आणि त्यानंतर हे सर्व नागरिक कुडाळ हायस्कूलच्या गेट वर धडकले.

कुडाळ हायस्कूलच्या संस्थाचालकांची चर्चा

या कथित पत्राचा आधार घेऊन कुडाळ शहर वासियांनी कुडाळ हायस्कूलच्या संस्था चालकांना भेटण्याचे ठरवले त्यानुसार कुडाळ हायस्कूलच्या गेटवर सर्वजण गोळा झाले आणि संस्थाचालकांचा पैकी कार्यवाह भाई तळेकर, अरविंद शिरसाट, आनंद वैद्य, का. आ. सामंत, द्वारकानाथ घुर्ये, अॅड. अमोल सामंत, गजानन कांदळगावकर, केदार सामंत, महेंद्र गवस, विक्रांत भोगटे, सागर तेली असे पदाधिकारी नागरिकांसमोर हजर झाले. यावेळी नागरिकांमधून प्रश्नांचा भडीमार करण्यात आला अभय शिरसाट यांनी विचारणा केली की ज्या व्यक्तीवर अश्लीलतेचे आरोप होत आहेत त्या व्यक्तीचे नाव शाळेला का ठेवले गेले तसेच शाळेला नाव ठेवायचे होते तर या शाळेसाठी योगदान दिले संस्थानचे राजा बापूसाहेब महाराज, राणीसाहेब सत्वशिला किंवा एस. एन. देसाई यांचे नाव दिले असते तर आम्ही कोणताही विरोध केला नसता कारण त्यांचे चारित्र्य जनतेसमोर आतापर्यंत स्वच्छ आहे मात्र ज्या व्यक्तीचे नाव दिले आहे त्या व्यक्तीवर आरोप आहेत हे नाव काढा तेव्हाच आम्ही या ठिकाणाहून जाऊ असे सांगितले त्यावेळी संस्थाचालकांकडून आनंद वैद्य यांनी सांगितले की हा निर्णय मुंबई येथील संस्थाचालकांचा आहे त्यामुळे नाव काढायचे असेल तर त्यांना आम्हाला विचारावं लागेल यावेळी मोठा गदारोळ झाला. पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक हुलावले यांनी नागरिकांना सांगितले की सध्या १४४ कलम लागू आहे त्यामुळे या कलमाचे कुठेही उल्लंघन करू देऊ नका असे सांगितल्यावर आनंद शिरवलकर यांनी सांगितले की जी घटना झाली आहे ती निंदनीय आहे त्यामुळे गावातील जनता उस्फूर्तपणे या ठिकाणी गोळा झाली आहे त्यांना कोणी आमंत्रण देऊन बोलवले नाही त्यामुळे त्याचा उल्लंघनाचा विषय येत नाही. त्यानंतर संस्थाचालकांनी आंदोलनकर्त्यांनी पैकी काही लोकांना चर्चेसाठी शाळेत आमंत्रित केले.

कुडाळ शहरातील नागरिकांनी केलेली चर्चा ठरली यशस्वी

शहरवासीय आणि कुडाळ हायस्कूलच्या संस्थाचालकांची संयुक्त चर्चा शाळेमध्ये झाले यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यात डॉ. अनिल नेरुरकर हा महत्त्वाचा मुद्दा ठरला त्यानंतर शाळेच्या इमारती बाबत वेळोवेळी डागडुजी असो किंवा नवीन इमारत बांधली जात असेल त्यावेळी प्रशासन कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया करत नाही या शाळेच्या केअर टेकरला २५ हजार रुपये दिले जातात हे पद कधीपासून निर्माण केले गेले आणि कशासाठी तयार केले गेले असे प्रश्न उपस्थित करण्यात आले बांधकाम देताना ठराविक ठरलेल्या ठेकेदारांना का? दिली जातात तसेच शाळेच्या ऑडिटमध्ये शासनाने निधी सुद्धा पुन्हा घेतली यामध्ये कोणाचा दोष होता हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर संस्थाचालकांचे धाबे दणाणले कुडाळ हायस्कूलमध्ये अनेक प्रकारे भ्रष्टाचार आहे मात्र तो आम्ही उघड करत नव्हतो कारण शाळेची बदनामी होते ठराविक लोकांसाठी ही शाळा कुरण करून ठेवलेली आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला अखेर संस्थाचालकांनी डॉ. अनिल नेरुरकर यांचे नाव कापड टाकून झाकोळले जाईल याची हमी दिली आणि जोपर्यंत मुंबई स्थित संस्थेचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे नाव तसेच झाकोळले जाईल आणि त्यानंतर नाव द्यायचं असेल तर शहरातील नागरिकांना विचारून या इंग्लिश मीडियमला नाव दिले जाईल असे सांगितले.

संस्थाचालकांकडून डॉ. अनिल नेरूरकर यांची पाठराखण

या चर्चेनंतर संस्था चालकांची बाजू विचारले असता संस्थेचे कार्यवाह भाई तळेकर यांनी सांगितले की ज्या पद्धतीने पत्रात डॉ. अनिल नेरूरकर यांचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तसे ते व्यक्ती नाहीत पण त्यांच्यावर अमेरिका म्हणजेच पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा असल्यामुळे काहीवेळा त्यांच्याकडून त्या पद्धतीच्या घटना घडल्या असतील त्या आम्ही नाकारत नाही असे सांगून या संस्थेसाठी त्यांचे मोठे योगदान आहे अमेरिकेतील त्यांच्या मित्रांकडून या शाळेसाठी चांगल्याप्रकारे निधी आलेला आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स या ठिकाणी सुरू करण्यास त्यांचा मोठा हातभार असून अमेरिकेतील त्यांचे काही मित्र ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना ते शिक्षण देतात त्यामुळे डॉ. अनिल नेरुरकर यांचे काही नुकसान होणार नाही तर येथील विद्यार्थ्यांचे निश्चित नुकसान होईल याची आम्हाला भीती असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले

अभिप्राय द्या..