दोन वर्ष काम रखडलेल्या खारलॅंड बंधाऱ्यामुळ ग्रामस्थांना करावा लागतो नैसर्गिक आपत्तीचा सामना

चिंदर सरपंच उपसरपंच कृषी अधिकारी यांच्या कडून नुकसानीची पाहणी

आचरा /-

पौर्णिमे नंतर सलग चार दिवसआलेल्या उधाणाचा फटका चिंदर लब्देवाडी साटमवाडी भागाला बसला आहे . या भागातील उन्हाळी भाजीपाला, भातशेती पाण्याखाली जाऊन शेकडो एकर जमिन क्षारपड होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेले दोन वर्षे होऊनही काम रखडलेल्या खारलॅंड बंधाऱ्याच्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा फटका या भागाला बसत असून तातडीने काम सुरू न केल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा येथील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
या बाबत चिंदर सरपंच उपसरपंच कृषी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली आहे.
चिंदर लब्देवाडी साटम वाडी भागात खाडी किनारी परीसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भातशेती बरोबरच चवळी,कुळीद मुग आदी कडधान्यांची लागवड केली जाते. पौर्णिमेनंतर सोमवारपासून सलग चार दिवस आलेल्या उधाणाचा फटका या भागाला बसला आहे.या भागातील ३५ते४०शेतकरयांच्या शेतात उधाणाचे खारे पाणी घुसल्याने सुमारे ७००एकर क्षेत्र खारपड होण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागातील भातशेती बरोबरच कडधान्य शेतीची खारया पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.चवळीची रोपे पिवळी पडून मरू लागली आहेत. या बाबत चिंदर सरपंच राजश्री कोदे,उप सरपंच दिपक सुर्वे, कृषी सहाय्यक सुनिल कदम, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या वेळी त्यांच्या समवेत शेतकरी प्रविण लब्दे, ग्रामपंचायत कर्मचारी रणजित दत्तदास आदी उपस्थित होते

*ठेकेदाराकडून बंधाऱ्याचे काम अर्धवट ठेवल्याने उधाणाचा फटका* –समिर लब्दे

चिंदर लब्देवाडी येथील शेतकरी व माजी ग्रामपंचायत सदस्य समिर लब्दे यांनी या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात उधाणाचे पाणी घुसण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे सांगून या भागासाठी मंजूर खारलॅंड बंधाऱ्याचे काम ठेकेदाराने वेळेवर पुर्ण केले असते तर उधाणाचे पाणी शेतात शिरले नसते.या साठी तातडीने काम सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबद्धल ग्रामस्थांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page