वेंगुर्ला /-
सन २०१९ -२० चा उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातून दाभोली शाळा नं.१ च्या उपशिक्षिका व उभदं|डा येथील रहिवासी सौ.प्रतिमा राजेश पेडणेकर यांना जाहीर झाला होता.कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही.दरम्यान ७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११.३० वा.ओरोस येथे होणाऱ्या शिक्षण समिती सभेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.याबाबत सौ.प्रतिमा पेडणेकर यांचे शैक्षणिक तसेच ईतर क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.