वेंगुर्ला तालुक्यात आज ६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात आज ६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-

कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव वाढत असून वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी आलेल्या कोव्हीड १९ (कोरोना) अहवालात नव्याने ६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात २ व्यक्ती , रेडी २ व्यक्ती व आसोली २ व्यक्ती येथील एकूण ६ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.ग्रामीण तसेच शहर एरियातही नव्याने कोरोना रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असून नागरिकांनी शासन नियमांचे “प्राधान्याने” पालन करावे,असे आवाहन डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..