राज्यस्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन प्रशालेचे यश..

राज्यस्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन प्रशालेचे यश..

वेंगुर्ला / –

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडिअम स्कूल, वेंगुर्ला या प्रशालेची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. सानिया सुदेश आंगचेकर हिने श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल स्पोर्ट्स ट्रस्ट मार्फत ३० मार्च रोजी डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय ओपन साईट रायफल शुटिंग स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकाविला.यासाठी तिला नेमबाज प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,संचालक प्रशांत नेरूरकर, सेक्रेटरी दत्तात्रय परुळेकर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोझा,क्रीडा शिक्षक हेमंत गावडे तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..