वेंगुर्ला /-
त्सुनामी,भूकंप,ज्वालामुखी, महापूर,चक्रीवादळ, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जगभरात कितीतरी देशांमध्ये आर्थिक व जीवितहानी होत असून ही टाळण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित केला आहे.आपत्ती सबंधी आपत्तीपूर्व,आपत्ती प्रसंगी व आपत्ती नंतर व्यवस्थापन बाबतीत लोकांना शिक्षित करणे, माहिती देवाण घेवाण करणे या सबंधी कार्यशाळा व प्रशिक्षण ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन प्रा.वामन गावडे यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, विद्यार्थी कल्याण विभाग, बहिःशाल शिक्षण मंडळ योजना व कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते अॅड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात प्रा. वामन गावडे ‘आपत्कालीन व्यवस्थापन ‘ या विषयावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.तर चर्चा सत्राच्या दुस-या टप्प्यात प्रा.डॉ. सुनील भिसे यांनी ” सामाजिक न्याय ” या विषयावर मार्गदर्शन केले.
एक दिवशीय चर्चा सत्राचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी.केळकर यांच्या हस्ते झाले.यावेळी बहिःशाल शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. डॉ. संजीव लिंगवत, कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ.पूजा कर्पे, डॉ. सोनाली सावंत, डॉ. मनोज आरोसकर, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. सतिश पाटील, डॉ. रवींद्र बुरूड,डॉ. श्रीराम हिर्लेकर, डॉ. दिपाली देसाई, डॉ. राखी माधव,डॉ. समता धुरी,डॉ. सिध्दी सावंत, डॉ.नयनेश गावडे, डॉ. प्रदिप जोशी, डॉ. सई लिंगवत,डॉ. आकाश घाडी, ग्रंथपाल निखिता डगरे, शेखर साळगावकर, सुर्यकांत शिरोडकर, हेलन डिसोझा आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव परब,सुत्रसंचालन श्रीकृष्ण जानकर यांनी व आभार स्नेहल गोसावी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलन नाईक,अँलिस डिसोझा, गणेश जायभाये, दिलिप नाईक, हरीचंद्र कोचरेकर, गुरुनाथ आडेलकर, राजा रेडकर, वृत्वीक पालव,ओमकार लाड, अमृता नरके,शितल पवार यांनी विशेष प्रयत्न केले.