सिंधूदुर्ग /-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने इयत्ता पाचवी या वर्गाची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवी या वर्गाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे 2021 रोजी होणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. यासाठी 10 एप्रिल 2021 पर्यंत आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे याची सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी दिली आहे.