कुडाळ एम.आय.डीसी.येथील मध्यपीनवर कुडाळ पोलिसांची कारवाई.;न्यायालयाकडून १०००/-दंड वसूल..

कुडाळ एम.आय.डीसी.येथील मध्यपीनवर कुडाळ पोलिसांची कारवाई.;न्यायालयाकडून १०००/-दंड वसूल..

कुडाळ /-

कुडाळ एमआयडीसी येथे दारू पिऊन वाहन चालविल्या प्रकरणी मुकेश रमेश गौतम या परप्रांतीयास कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.या प्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक हजार रुपये दंड सुनावला.ही कारवाई सायंकाळी ५.३० वा केली आहे.

कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या बाजुला कुडाळ पोलिस स्टेशनच्या वाहतुक शाखेचे ई. बी.सरमळकर व दया चव्हाण यांनी जाऊन तेथे असणार्‍या काही वाहनधारकांची तपासणी केली असता मुकेश रमेश गौतम हा परप्रांतीय मद्यप्राशन करून वाहन चालवताना मिळून आला.या प्रकरणी त्याच्यावर मोटर वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८५ (१) ३/१८८ प्रमाणे गुन्हा दाखल ताब्यात घेत कुडाळ न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्याला एक हजार रुपये दंड सुनावला आहे.

अभिप्राय द्या..