बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय विद्यार्थ्यांचे आभासी युवा महोत्सवात यश..

बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय विद्यार्थ्यांचे आभासी युवा महोत्सवात यश..

वेंगुर्ला /-

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या ५३ व्या आभासी युवा महोत्सवात वेंगुर्ले बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या गौरव राऊळ याने एकपात्री अभिनयात सिंधुदुर्ग विभागात प्रथम क्रमांक पटकावला. तर याच महाविद्यालयाची दिव्यता मसुरकर हिने कथाकथन स्पर्धेत द्वितीय व वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने आभासी पध्दतीने युवा महोत्सव आयोजित केला होता. या महात्सवात भुवनेश मेस्त्री याने चित्रकला, विराट वस्त याने मिमिक्री स्पर्धेत भाग घेतला होता. यशस्वी स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी त्यांना अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सांस्कृतिक समितीचे प्रा. वामन गावडे, प्रा. मनिषा मुजुमदार, प्रा. आनंद बांदेकर, स्टाफ सेक्रेटरी प्रा. देविदास आरोलकर, प्रा. जे. वाय. नाईक, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..